मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी तालुक्यातील राजाराम (खां) येथील पोलीस स्टेशन हद्दीत बसविण्यात आलेले भारत सरकार निगम लिमिटेड (BSNl)व जिओ स्टॉवर शोभेची वास्तू बनून आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यापासून नेटवर्कचा समस्या कायम सुरु असून मोबाईल धारकांना नेटवर्कमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. कधी-कधी फोन लागतात तर मध्येच फोन कट होतात. Bsnl आणि जिओ कंपनी फक्त मोबाईल धारकांची पैसे लुटण्यासाठी स्टावर उभारण्यात आले की, काय असे मोबाईल धारकांकडून ऐकायला मिळत आहे.कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन कामे करण्याकरिता नेटवर्क चा धावपळ करावा लागत आहे.
राजाराम परिसरात जिल्हा परिषद शाळा, भगवंतराव आश्राम शाळा, उप पोलीस स्टेशन ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय वनविभाग कार्यालय, असून अनेक विविध कामे नेटवर्क शिवाय टप्प पडलेली आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन तात्काळ बीएसएनएल व जिओ स्टॉवर दुरुस्ती करण्यात यावे अशी मागणी. राजाराम,खांदला, पातीगाव, कोतागुडम, चिरेपल्ली, कोरेपल्ली, मरनेल्ली, सूर्यपली इत्यादी गावातील मोबाईल धारकांनी केली आहे.

