प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- शहरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये 2 कोटी 33 लाख 21 हजार रुपये खर्च करून बांधकाम करण्यात येत असलेल्या मोठ्या नाल्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करून निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात येत असल्याचे नागरिकांनी भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांच्या कार्यालयास तक्रार केली.
सदर अर्जदाराने नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन सदर नाल्याची चौकशी करण्याकरिता नागरिक आणि कित्येकदा केली मागणी परंतु नगरपालिका मध्ये विचित्र प्रकार दिसून येत आहे. मान्यताप्राप्त एक ठेकेदार व त्याच्या संकल मध्ये दहा लोकल ठेकेदार आहे ज्यांनी हा ठेका घेतला तो ठेकेदार जागेवर उपस्थित नाही कामे वाटून वरील कमिशन कमावण्याच्या नादात नाल्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारत जात आहे.
प्राप्त माहितीनुसार बांधण्यात येत असलेल्या नाल्याचे खोदकाम 2 फूट असून लोकल ठेकेदाराने नाल्यातील गाडा काढून दोन फूट खोदले असे नमूद करून दाखवले व 47 ट्रॅक्टर नाल्यातील मलमा निघाला जेसीबी द्वारे ते खोदकाम नसून फक्त मलमा काढला तेथील नागरिकांनी भ्रष्ट कामाचा विरोध केला परंतु ठेकेदार व नगरपालिका मनमानी कारभार करून नागरिकाच्या तक्रारीस केराची टोपली दाखवली आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांनी भीम आर्मी कार्यालय गाठून तक्रार बाबत तक्रार केली. यावेळी नागरिकांच्या मागण्या नाल्याचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाने व्हावे गाळा काढून दोन फूट खोदावे व भ्रष्ट काम त्वरित थांबवावे परंतु ठेकेदार आपली मनमानी करून निष्कृष्ट दर्जाचे काम करीत आहे. त्यावर नगरपालिकेने कामाची चौकशी करून त्वरित काम थांबून ज्यांनी ठेका घेतला आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये काम करून घ्यावे अन्यथा भीम आर्मी द्वारा पाठपुरावरून भ्रष्टाचार नाल्याची पोलखोल आंदोलन करणार भीम आर्मीतील नागपूर येथील तज्ञ इंजिनियरची टीम बोलून कामाची चौकशी करणार आणि भ्रष्टाचार असल्यास ठेकेदार तसेच लोकल ठेकेदार यांच्या वर शासनाची दिशाभूल करून कामांमध्ये निष्कृष्ट दर्जाचे आणि इन्स्ट्रुमेंट द्वारे काम न केल्याचे आढळून आल्यास त्याचे लायसन रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित असलेले नागरिक हिटलर हुमणे, सुनील साखरकर, प्रवीण धाडसे, पंजाबराव ढेबे, रमेश डोके, किशनराव कुंभारे, नरेंद्र निनावे, संदीप उके, अनिल तुर्के, इत्यादी गण उपस्थित होते. विशेष म्हणजे, नगरपालिका मध्ये एकच ठेकेदाराच्या नावावर कोट्यावधीचे विकास कामाचा निधी उचलले गेले आहे. यापैकी अनेक कामे मॅनेज करण्यासाठी लोकल ठेकेदार नगरपालिकेमध्ये ठिय्या मांडून दिसून येतात चार ते पाच लाखाचे काम ऑफलाइन द्वारा मॅनेज करून तिथेच कामाचा वाटप केला जातो. यावर जिल्हा प्रशासनाने झालेल्या कामाची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.