संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 26 फेब्रु:- विदर्भ युनिव्हर्सिटी फिजिक्स टीचर्स असोसिएशन द्वारे 2024 गडचिरोली, नागपूर, अमरावती आंतरविद्यापीठाद्वारे गडचिरोली येथे आयोजित विद्यार्थ्यांची चर्चासत्र स्पर्धा आणि
पोस्टर प्रेसेंटेशन कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे पोस्टर प्रेझेंटेशन व रिसर्च मॉडेलव्दारे सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये तीन विद्यापीठाचे 75 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात राधिका दोरखंडे ने प्रथम क्रमांक पटकाविला.
विशेष म्हणजे या स्पर्धेत पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन चे विद्यार्थी होते. या स्पर्धेत द्वितीय, तृतीय बक्षिसे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी पटकावले तर पोस्ट ग्रॅज्युएशन च्या विद्यार्थ्यांना मागे टाकत अंडर ग्रॅज्युएशनची राधिका दोरखंडे हिने प्रथम बक्षीस पटकावून गरुडझेप घेतली. तीनही विद्यापीठात मानाचा तुरा लावून आपलं नावलौकिक कमविणाऱ्या राधिका दोरखंडे हिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. निश्चितच राधिकाने कमावलेले प्रथम पारितोषिक श्री शिवाजी महाविद्यालय करिता अभिमानास्पद आहे. राधिका दोरखंडे हीचे अभिनंदन प्राचार्य डॉ. एस.एम. वरकड, उप प्राचार्य डॉ. राजेश खेराणी, डॉ. विशाल दूधे , माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे, सचिव बादल बेले यांनी केले आहे.

