लोहार व तत्सम समाज संघटनेचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातुन केली मागणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- लोहार जमात व तिच्या तत्सम जमाती अत्यंत मागासलेल्या असूनअत्यंत हलाकीचे व निकृष्ट दर्जाचे जीवन जगत आहे. शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून देणारा समाज आज उपेक्षित आहे. सण-१९४१ व१९५८ च्या आदेशानुसार लोहार जमातीला अनु. जमातीचे सवलती लागू करण्यात आले होते परंतु १९७६ च्या अनु. जाती जमाती सुधारणा आदेशात लोहार समाजाला अनु. जमातीतुन वगळण्यात आले आहे तरी लोहार जमातीला पूर्ववत अनु. जमातीत समाविष्ट करून अनु. जमातीचे सवलती लागू करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
विदर्भ प्रदेश १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट केले त्यांनतर १९७६ साली सुधारित जाती जमाती आदेशात लोहार जमातीला वगळून कमार जमात म्हणून अनु क्र.२० वर समाविष्ट केलेला आहे.कमार म्हणजेच लोहार अशी नोंदी समाजशास्त्रीय व मानववंशशास्त्रीय -जुन्या दस्तऐवजात नमूदअसल्याचे आढळून आल्या आहेत.त्यामुळे केंद्रसरकारने १९७६ च्या अमेंटमेंट आदेशामध्ये कमार जमातीच्या तत्सम जमाती म्हणून महाराष्ट्रातील लोहार व तिच्या उपजातींना समाविष्ट करून अनु. जमाती प्रवर्गाचे पुर्ववत सुरू करावे व सदर जमातीवर झालेला अन्याय दूर करावे अशी मागणी२०२० साली पासून शासनाला विनंती करण्यात येत आहे आणि या संदर्भात बराच पाठपुरावा करण्यात आले आहे.परंतु ही मागणी शासनाने अद्याप ही मंजूर करण्यात आली नाही करिता महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ गडचिरोली आणि वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम समाज संघ नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे.
निवेदन सादर होताच त्वरित कार्यवाही सुरू करूनलोहार व तिच्या उपजमातींना अनु. जमातीचे सवलती लागू करावी अन्यथा महाराष्ट्र राज्यातील या जमातीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईलया बाबतची शासनाने नोंद घ्यावी अशी मागणी अहेरी तालुका शाखा, इंदाराम गावशाखा, राजाराम गावशाखा, मुलचेरा तालुका शाखेने निवेदनातुन मागणी केली आहे.
निवेदन सादर करताना अहेरी तालुकाध्यक्ष प्रा. विनोद बावणे, कार्याध्यक्ष ऍड. यशवंत मेश्राम, संघटक ईश्वर मांडवकर, तालुका सचिव सर्व्हेश्वर मांडवकर, तालुका उपाध्यक्ष सेवा निवृत्त वनपाल चिंतामण बावणे, राजाराम चे अध्यक्ष रमेश बामनकर, कार्याध्यक्ष गोपाल चंदनखेडे, उपाध्यक्ष राकेश कोसरे, सचिव दिलिप मेश्राम, तालुका सदस्य साईबाबा बामनकर,युवाध्यक्ष आशीष चंदनखेडे, माजी तालुका अध्यक्ष एस. एस. चंदनखेडे इंदाराम चे अध्यक्ष वसंत मेश्राम, कार्याध्यक्ष विनोद औतकर, सचिव बालचंद्र मेश्राम, उपाध्यक्ष साईनाथ हजारे, तालुका कोषाध्यक्ष मनोहर बावणे, सदस्य राकेश मेश्राम मुलचेरा तालुकाध्यक्ष बंडू बावणे, कार्याध्यक्ष राजेंद्र सोनटक्के,उपाध्यक्ष आनंद बावणे, सचिव संदीप सोनटक्के आदी लोहार समाज संघटनेचे शिष्टमंडळ उपस्थित होते.