अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिवसेंदिवस उन्हाचे चटके जाणून लागले आहे. सर्वत्र पानगळ सुरू असून रानावनात सुद्धा पक्षांच्या नैसर्गिक अन्नाची, दानापाण्याची कमतरता निर्माण होत आहे. शहरी भागात तर पक्षांना दाना पाण्या करीता भटकंती करावी लागते. याकरिता नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी. या उद्देशाने येथील नारायण सेवा मित्रपरिवार हिंगणघाट चे वतीने दाना पात्राचे वितरण करण्यात आले . स्थानिय बन्सीलाल कटारिया रत्न विद्यानिकेतन शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पारस मुणोत तर प्रमुख अतिथी विश्रांती कुंटेवार, श्रीमती पोद्दार, श्रीमती किरण मूनोत, हेमंत ओस्तवाल, मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल उपस्थिती होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना दाणा पात्राचे वितरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी ओस्तवाल म्हणाले की उन्हाळ्यात प्रत्येक नागरिकाने आपल्या छतावर दाना पात्र लावून पक्षांकरीता अन्नाची व्यवस्था करावी, असे आवाहन केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात मुनोत म्हणाले की नारायण सेवा मित्र परिवाराचे मानव सेवा, गौसेवा, जीवदया हे कार्य अलौकिक असून समाजाकरीता आदर्श असल्याचे मत प्रगट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम कोठारी तर संचालन सचिव पराग मुडे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. किरण वैद्य यांनी मानले. कार्यक्रमाला नारायण सेवा मित्र परिवाराचे पदाधिकारी, सदस्य व गणमान्य नागरिक उपस्थित होते.