अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर :- 27 फेब्रुवारी ला रात्री 9 वा. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र 47 नागपूर कडून पांढर्णा रोडने जाणाऱ्या दुचाकी क्र.MH 40 BH 4798 चा चालक सागर सहारे रा. सावनेर याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपने चालवून रस्ता ओलांडणाऱ्या इसम राजू उदयकर वय 40 रा.खापा नरसाळा यास जोरदार धडक दिल्याने त्यास गंभीर जखमी केल्याने त्याचा डावा पाय मोडला.
सदरची माहिती श्रीधर नानवटकर रा. हेटी यांनी तात्काळ महामार्ग पोलीस यांना देताच प्रभारी सपोनि विजय मुसनवार यांनी स्टाफ सह धाव घेऊन घटनास्थळी पडलेल्या जखमी व वाहन चालकास हेटी गावातील बारिश पाटील यांचे खाजगी वाहनाने व बंटी, तागडे, रोशन व पोलीस अंमलदार राऊत, टेकाडे, दराडे तसेच ठाकूर यांच्या मदतीने उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात रवाना केले. घटनेची माहिती सावनेर पोलिसांना देण्यात आली पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे.