निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोपरणा:- तालुक्यातील एकोडी येथे गेल्या काही वर्षांपासून गोसाईबाबा क्रीडामंडळ एकोडी यांचे माध्यमातुन समस्त ग्रामवासी एकोडी यांच्या वतीने खुले दोन दिवशीय दिवस रात्रकालीन कबड्डी स्पर्धा घेण्यात येत आहे. पुढे सुद्धा हा कबड्डीचा खेळ अविरत सुरू राहील’ असे प्रतिपादन सेवा कळस फाऊंडेशन चे अध्यक्ष अभिजित दादा धोटे यांनी एकोडीतील गोखरे यांच्या शेतातील प्रांगणात कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करतांना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कॉग्रेसचे जेष्ठ तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश मालेकर संचालक सेवा सहकारी संस्था भोयगाव किसन डोंगे, माजी सभापती कोरपना रवींद्र गोखरे शंकर बोढे, एकनाथ गोखरे, साईनाथ मंदाडे पोलीस पाटील एकोडी दत्तात्रय पाचभाई, भिकाजी मिलमिले, सुनील पवार, देवराव ठावरी, निखिल पिदूरकर हे उपस्थित होते.
ही कबड्डी स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी नितीन मिलमिले, घनश्याम मिलमीले,सतीश बोढे, अक्षय दळाजे, रोहित मिलमिले समीर पावर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

