प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा तून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने बँक मधून पैसे काढून मोजत असताना एका आरोपीने पैसे मोजण्याच्या बाहण्याने पैसे लुटले होते. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सौ. रंजना दिगांबर वाघाडे रा. बाभुळगाव बोबडे, तह. देवळी ह्या दि. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी पुलगाव येथील बॅक ऑफ इंडिया येथून बचत गटाचे 40 हजार रुपये काढले होते व ते पैसे बॅंकेतील एका खुर्चीवर बसुन मोजत होते. तेव्हा एक अनोळखी ईसम त्यांचे जवळ आला व पैसे मोजण्याचे बहानाने पैसे त्याने स्वतः जवळ घेतले व हातचलाखी करून परस्पर 16 हजार रुपये घेवुन प्रसार झाला. त्यानंतर फिर्यादीने पैसे मोजले असता, त्यामध्ये 16 हजार रुपये कमी मिळुन आल्याने, त्यांची फसवणुक झाल्याचे त्यांना समजुन आल्याने त्यांनी दि. 21 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन पुलगाव येथे तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अप क्र. 172/ 2024 कलम 406, 420 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पथक करीत होते. त्यादरम्यान दि. 28 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे त्यांनी आरोपी नामे नासिर अली आमीर अली, वय 45 वर्ष, रा. ग्रामपंचायत समोर येरखेडा, तह. कामठी, जि. नागपुर यास त्याचे राहते घरून ताब्यात घेवुन, सखोल विचारपुस केली असता, आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असुन, त्याने फसवणुक करून चोरी केलेल्या 16,000 रू पैकी काही रक्कम त्याने त्याचे आईचे उपचाराकरीता खर्च केली असून, त्याकडे 4,710 रू. शिल्लक असल्याचे सांगितलेवरून, सदर रक्कम जप्त करून, आरोपी व जप्त रक्कम पो.स्टेे. पुलगाव यांचे स्वाधीन करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नी. संतोष दरेकर, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. अरविंद येनुरकर, संजय बोगा, पो.अं. विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली.