अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- 28 फेब्रुवारी बुधवारला गोमुख उच्च माध्यमिक विद्यालय तिष्टी बु येथे इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांन करीता ‘निरोप समारंभ’ कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरस्वती प्रासादिक शिक्षण संस्था नांदागोमुख चे पालक सदस्य लिलाधरजी जीवतोडे (पाटील) हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राध्यापक योगराज लखमापुरे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पंधरे, मुख्य मार्गदर्शक म्हणून दशरथ बोबडे अभिषेक गहरवार सावनेर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी तिष्टी (बु.) येथील सरपंच सौ.मंगलाताई घोरमारे, उपसरपंच सुहास पाटील, पालक समितीचे उपाध्यक्ष रमेश ताजने, सुरेश मौजे, उल्हासराव मोहतकर, परिवहन समितीचे सदस्य रोशन जीवतोडे, माता पालक समिती सदस्य सौ.निताताई दुधकवरे, सौ.किर्तीताई चरडे, सौ. पाटील मॅडम उपस्थित होत्या.
याप्रसंगी प्रमुख वक्ते योगराज लखमापुरे व दशरथ बोबडे, अभिषेक गहरवार यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी नंतर स्पर्धा परीक्षा व इतर कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत व अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून कशा प्रकारे देशसेवा करता येईल व एक आदर्श नागरिक म्हणून स्वतःची ओळख कशाप्रकारे निर्माण करता येईल याविषयीचे मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष महोदयांनी सुद्धा विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांन कडून शाळेला पृथ्वीचा ग्लोब व विविध नकाशे भेट स्वरुपात दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पंधरे सरांनी केले तर संचालन राजेंद्र कुथे यांनी केले. या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार इयत्ता नववी चे वर्ग शिक्षक रोशन मिलमिले यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यालयातील सौ.रंजिता जोगी मॅडम, कु. स्नेहा देवलकर मॅडम, श्री.वैभव पोतले सर, श्री.राजेश मारबते सर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्याना स्वादिष्ट जेवन देण्यात आले.

