अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १ मार्च:- ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे सावनेर तालुक्यात गहु, चना जमीन धोस्त झाला. कापसाची बोंडे गळली असून तुरीच्या उभ्या पिकाचे तसेच आंबा, मोसंबी चा बार गळल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडा जवळ आलेली पिके भुईसपाट झाली आली. शेतकरी संकटात सापडला आहे.
प्रशासनाने नुकसान झालेल्या भागात तात्काळ मध्ये पटवारी व रेव्हन्यु इन्स्पेक्टर यांचे मार्फत सर्वे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतिने तहसीलदार सावनेऱ यांना करण्यात आली आहे. या आशियाचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष उत्तमभाऊ कापसे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेले आहे.
याप्रसंगी हिमांशु बटोले, हितांशु ठाकरे, मंथन डोबाळे, अंकित करपे, मुन्ना मोरे, तुषार आसोले,
सुशांक सार्वे, आकाश पिंपळशेंडे, आशू झाडे, शेखर बांबल, ढुल्लीचंद तलेकर, ऋतिक इंगले इत्यादी पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.