वंचित बहुजन आघाडी कडून बस चालक व वाहक यांचा प्रत्येक बस स्टॉप वर सत्कार
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- परतुर वझर सरकटे ही बस सेवा जवळपास चार ते पाच वर्षापासून बंद होती. वझर सरकटे ते परतुर या रूटने जास्त प्रमाणात प्रवाशांचे संख्या असते. वाटुर ही मोठी बाजारपेठ असल्याने या मार्गाने प्रवासी जास्त प्रमाणात प्रवास करतात. या बंद पडलेल्या बस सेवेसाठी कुठल्याच राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला नाही अखेर वंचित बहुजन आघाडी या पक्षाने नागरिकांच्या समस्या लक्षात घेत परतुर डीएम ऑफिसला निवेदन देऊन उपोषणाची हाक देऊन प्रवाशासाठी बस सेवा सुरू केली.
आज दिनांक 1 मार्च 2024 वार शुक्रवार या दिवशी परतुर ते वझर सरकटे बस सेवा चालू झाली. या बसमधील चालक व वाहक यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाटुर येथून, प्रत्येक बस स्टॉप वर करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जालना जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन, मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, अंबादास खरात महासचिव मंठा, वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक पुरुषोत्तम यावेळी उपस्थित होते.

