रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील दैठणा (खु.) गावचे सरपंच सुनील तायडे यांनी गटविकास अधिकारी रोहनकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच सुनील तायडे गटविकास अधिकारी रोहनकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सुनील तायडे बोलत होते की गटविकास अधिकारी रोहनकर हे भाजप वाल्यांनी बंगल्या वरून पंचायत समिती कार्यालयात बसवलेला त्यांच्या हातातील रिमोट कंट्रोल वर चालनारा आहे. हा शासनाचा अधिकारी नसून हा तर पूर्णपणे भाजप पक्षाच काम करणारा आहे आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, पक्षाचे सरपंच असो किंवा इतर कोणत्या पक्षाचे असो त्यांना पस्टपने सांगतो की मी गटविकास अधिकारी रोहनकर फक्त आणि फक्त भाजपच्या लोकांचे काम करण्यासाठी आलो आहे आणि भाजप व्यतिरिक्त मला कुठल्याच पक्षाचे काम करण्याचे आदेश नाहीत त्यामुळे गटविकास अधिकारी बाकी ग्रामपंचायत चे काम पेंडींग ठेवतो जाणुन बुजुन त्रास देतो आणि जाब विचारला तर भाजप पक्षात प्रवेश करायला सांगतो की भाजप पक्षात प्रवेश केल्यावर तुमचे कुठलेच काम पेंडिंग राहणार नाही हा गटविकास अधिकारी हुकुमशाही पद्धतीने इतर पक्षांच्या सरपांचावर दबाव टाकण्याचा काम करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस च्या सरपंच सुनील तायडे यांना भाजप पक्षात प्रवेशघेण्यासाठी सांगतो आहे शासनाचा पगार घेतो आणि काम मात्र भाजप पक्षाच करतो अशा गटविकास अधिकाऱ्यांना कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे जेणे करून गट विकास अधिकारी हुकूमशहा सारखा वागणूक देणार नाही म्हणून गटविकास अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून सरपंच सुनील तायडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.