शिवसेना महिला जिल्हा प्रमुख़ सौ. उज्वला नलगे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव होते उपस्थित होते.
सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- नवनिर्वाचित गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांचा बल्लारपुर शिवसेना तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. नुकताच पार पडलेल्या गोडवाना विद्यापीठ सिनेट च्या निवडणुकीत सेक्युलर पॅनल तर्फे युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांनी दणदणीत विजय मिळविल्याने शिवसेने ने गौंढवाना विद्यापीठात प्रवेश केला. या निमित्ताने बल्लारपुर शिवसेना तर्फे प्रा. निलेश बेलखेडे यांच्या सत्कार समारोह सार्वजनिक विश्रामगृह बल्लारपुर येथे सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख व महिला जिला सौ. प्रमुख उज्ज्वला नलगे यांचा प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.
सर्वप्रथम बल्लारपुर शिवसेना तर्फे नगर परिषद परिसरात फटाके अतिषबाजी करून नवनिर्वाचित सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांचे स्वागत केले त्यानंतर सार्वजनिक विश्रामगृह बल्लारपुरात महिला आघाडी व युवासेना व युवती सेना तर्फे शाल व श्रीफळ ने सत्कार करण्यात आले. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना निलेश बेलखेडे यांनी वंदनीय बाळासाहेबांचे आदर्श शिरोधार्य करत जनसेवा करिता कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाचा आयोजन शिवसेना उप जिल्हाप्रमुख महिला आघाडी च्या सौ.कल्पना गोरघाटे व सौ. मीनाक्षी गलघट यांच्या पुढाकाराने करण्यात आला. या प्रसंगी प्रामुख्याने माननीय प्रकाश पाठक तालुका प्रमुख, बाबा शाहू शहर प्रमुख, अधि. प्रणय काकडे तालुका समन्वयक, प्रदीप गेडाम, अनुदान योजना समिती सदस्य जनाब शेख युसूफ व प्रभाकर मुरकुटे पूर्व नगरसेवक, दिनेश लीचोडे, नीरज यादव,बुटले भाऊ, रोनीत गलघट, अनिकेत बेलखोडे, उप शहर प्रमुख रामु मेदरवार, बॉबी कादासी, रतिन चक्रवर्ती, आनंद हनमंत्तु, सुरेंद्र संधू, तसेच महिला आघाडी च्या तालुका प्रमुख सौ. सुवर्णा मुरकुटे, शहर प्रमुख सौ. ज्योती गेहलोत, माजी नगरसेविका सौ.रंजीता बीरे, सौ. प्रगति झुल्लारे, लावारी उप सरपंच सौ. सुनीता राजूरकर, चंद्रपूर महिला आघाडी च्या सौ.प्रतिभा तेलतुम्बडे व सौ.विद्या ठाकरे, अधि.अर्चना महाजन , वैष्णवी लिचोडे, ज्योती गुप्ता, गुड्डी बहुरिया सह असंख्य कार्यकर्ता उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा संचालन अधि. प्रणय काकडे तर आभार सौ. कल्पना गोरघाटे यानी केला.