गोंडपिपरी तालुका काँग्रेसनी गोंडपिपरी तहसीलदारांना दिले गौतम झाडे यांचे वर शिवीगाळ व मारहाण घटनेचे निषेधार्थ निवेदन
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी; दि.१४ सप्टेंबर:- येथील काँग्रेस नेते व चेक बोरगावचे माजी उपसरपंच गौतम झाडे यांच्यावर १० सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळच्या सुमारास यांना काही लोकांनी शिवागाळ व मारहाण केली होती. त्यामुळे गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस अनु. जाती विभाग अध्यक्ष गौतमजी झाडे यांच्यावर झालेल्या शिवीगाळ व मारहाण प्रकरणाचा जाहीर निषेध करून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
गोंडपिपरी तालुक्यात चेक बोरगाव येथील तालुका काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष व चेक बोरगाव चे माजी उपसरपंच श्री.गौतम झाडे हे दिनांक १० सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळच्या दरम्यान ग्रामपंचायत जवळील सिमेंट बेंचवर सहकार्यासह बसून असताना गणपती विसर्जन करून परत येणाऱ्या मंडळींपैकी राजकीय वादातून रागाच्या भरात गौतमजी झाडे यांना शिवीगाळ व मारहाण केली. मारहाण करणाऱ्या आठ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
परंतु असे हल्ला प्रकरण भविष्यात कोणावरही घडू शकते. गौतमजी झाडे हे चेक बोरगाव येथील माजी उपसरपंच असून गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत. सदर गैरकृत्य हे केवळ वैयक्तिक वादातून नसून, राजकीय आकसापोटी घडलेल आहे त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यावर झाल्यास तालुका काँग्रेस खपवून घेणार नाही.त्यामुळे सदर मारहाण प्रकरणाचा गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. असे निवेदन गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीने गोंडपिपरी तालुक्याच्या तहसीलदारांना दिले.
निवेदनादरम्यान तुकाराम झाडे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, निलेश संगमवार कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, रेखाताई रामटेके महिला तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, अशोक रेचनकर माजी उपसभापती बाजार समिती गोंडपिपरी, देविदास सातपुते सरपंच पोडसा, विनोद नागापुरे अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती गोंडपिपरी, नामदेव सांगडे माजी सरपंच धाबा तथा उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, बालाजी चणकापुरे उपसरपंच दरुर, जितेंद्र गोहणे तालुका सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख काँग्रेस गोंडपिपरी, नितेश मेश्राम तालुका उपाध्यक्ष काँग्रेस गोंडपिपरी, सुनील झाडे सरपंच धामणगाव, आनंदराव कोडापे चेक नांदगाव, सोनल झाडे युवा काँग्रेस कार्यकर्ते धाबा, बबलू कुडमेथे काँग्रेस नेते गोंडपिपरी, अनिल कोरडे टोले नांदगाव, पोचमल्लू ऊलेंदला सरपंच चेक घडोली आदी उपस्थित होते.