अनिल अडकिने, नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- ग्रामीण रुग्णालय सावनेर येथील सेवानिवृत्त कर्मचारी अशोक धांडोळे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम 2 मार्च ला ग्रामीण रुग्णालयात पार पडला. श्री.अशोक धांडोळे यांनी आपल्या जीवनातील अमूल्य 29 वर्ष रुग्णांची सेवा केली. 29 फेब्रुवारीला सेवेतून निवृत्त झाले.
सावनेर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.मंजुषा ढोबळे यांनी सेवानिवृत्त कर्मचारी श्री.अशोक धांडोळे यांचा यावेळी शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात उपस्थिता मध्ये डॉ. गुजर, डॉ.जैस्वाल, डॉ.फुले, डॉ. नंदनवार तसेच बरेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश धोटे यांनी केले. तर आभार आरती शीरसागर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता घनश्याम तुर्के, गणेश चांदेकर व ईतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.