मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सध्या वर्धा जिल्ह्यात गाजत असलेले प्रकरण म्हणजे परभणी जिल्हाचे उपजिल्हाधिकारी तथा वर्धा जिल्हाचे तत्कालीन भूसंपादन अधिकारी आणि आता परभणी इथे कार्यरत असलेल्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांचे 2 कोटी 63 लक्ष रुपये भ्रष्टाचार प्रकरण समोर आल्याने जिल्हात आणि राज्यात खळबळ उडाली आहे. एका महिला भष्ट्राचारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींचा निधी हडप केला आणि तो आदर्श महिला नागरी सहकारी पत संस्थेत जमा करण्यात आल्याने या बँकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
सविस्तर सांगायचं झाल्यास काही शेतकऱ्यांची भूसंपादनाची रक्कम शासनाकडे अडकून पडली होती आणि याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून रक्कम देण्याची मागणी केली आणि शासनाने दिली. पण स्वाती सूर्यवंशी यांचा मनसुबा वेगळा होता ती रक्कम त्यांना हडप करायची होती. त्यासाठी गरज होती एका पतसंस्थेची. पुलगाव येथील एका ठेकेदाराच्या मधस्थीने हिंगणघाट येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचे अध्यक्ष आचल थुल यांची गाठभेट झाली आणि खिचडी शिजण्यास सुरुवात झाली.
आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट यांच्या पतसंस्थेत खाते खोलण्याचे कुठलेही फॉर्म न भरता या चार लोकांचे खाते खोलण्यात आले त्यासाठी स्वाती सूर्यवंशी यांनी आचल थुल यांना व्हॉट्सॲप च्या माध्यमातून आधार कार्ड पाठवली आणि आचल थुल यांनी त्यांच्या आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था जाचे ते अध्यक्ष आहेत त्या पतसंस्थेत यांची कुठलीही शहनिशा न करता किंव्हा फॉर्मवर सही न घेता या चार लोकांची खाते खोलले.
महत्वाचं विषय असा की खातेदार उपस्थित नसताना देखील त्यांच्या नावाने खाते कसे खोलल्या गेले? स्वतः खातेदार पतसंस्थेच्या अधिकाऱ्या समक्ष जो पर्यंत सही करत नाही त्याची ओळख पटत नाही तोपर्यंत खाते खोलल्या जात नाही तरी देखील हे चार खाते खोलल्या गेली? अशी माहिती स्वतः हा अध्यक्ष आचल थूल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपण ज्या 4 व्यक्तीचे खाते काढले आणि त्यात कोट्यवधी रुपये जमा झाले. यावरून स्पष्ट होते की, या सर्व भ्रष्टाचाराची कल्पना पत संस्थाचे अध्यक्ष आचल थूल यांना या भष्ट्रचाराची माहिती होती आणि खाते काढणे हे त्या कथानकाचा एक भाग होते कारण हे सर्व पैसे स्वाती सूर्यवंशी हडप करणार होत्या आणि त्यात काही भागीदार देखील असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट या पत संस्थेत असे किती बनावट खाते बनवली गेली याची संपूर्ण चौकशी झाल्यास काही खळबळजनक सत्य बाहेर येईल.
आदर्श महिला नागरी सहकारी पत संस्था शासकीय पैश्याचा काळा पैसा चलनात आणून सफेद करण्याचा प्रकार तर करत नाही अशी शंका आल्यावाचून राहत नाही. एकूणच या सर्व प्रकारामुळे या पतसंस्थेत असलेल्या ठेविबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
हिंगणघाट येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने खातेदारांची ओळख न पटवून घेता खाते काढले हे रिझर्व्ह बँकेचे मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवले असे प्रथम दर्शनी दिसते. यामुळे रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करून आपल्या अधिकाराचा वापर करून जनतेच्या ठेवी सुरक्षित करण्यासाठी कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे. तसेच सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी या सहकारी पत संस्थेवर कठोर कारवाई करून सत्य समोर आणण्यासाठी चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या सर्व प्रकरणात काही राजकीय हितसंबंध गुंतले का याची सुध्धा चौकशीत होणे अपेक्षित आहे सोबतच भ्रष्टाचारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर कठोर कारवाही पोलीस प्रशासन यांच्या मार्फत अपेक्षित आहे.

