अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावर यांच्या सततच्या पाठपुराव्याने आज ०१ मार्चला विधानभवन मुंबई येथे हिंगणघाट क्षेत्रातील तसेच चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील निम्मं वेणा प्रकल्प व दिंदोडा प्रकल्प या दोन्ही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या आदेशाने आमदार समीर कुणावार तथा जलसंपदा विभागचे प्रधान सचिव कपूर साहेब व उपमुख्यंत्री यांचे सचिव परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री यांच्या दालनात बैठक पार पडली.
यावेळी वरोराचे आमदार प्रतिभा धानोरकर, राळेगावचे आमदार डॉ.अशोक उईके तथा वणी चे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांची सुध्दा प्रमुख उपस्थितीत होती. आमदार कुणावार यांनी नागपूर अधिवेशनामध्ये वरील दोन्हीही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या भु भाडे व उर्वरित अनुदानासाठीचा मुद्दा राज्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडला होता व त्यावेळी त्यांनी या मुद्यावर बैठक लावण्याचे आश्वासन आमदार कुणावार यांना दिले होते.
यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळत विधानभवन मुंबई येथे बैठक लावली असून या आढावा बैठकीत मुख्य मुद्दे समजून घेत येत्या 06 तारखे पर्यंत प्रश्न मार्गी लागणार असे आश्वासन प्रधान सचिव यांनी आमदार समीर कुणावार यांना व उपस्थित शेतकऱ्यांना दिले आहे. या बैठकीला निम्न वेणा प्रकल्प तथा दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.