सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- सामाजिक, राजकीय व कृषिक्षेत्रात उत्तम असे कार्य करनारे युवा नेतृत्व, भाजपाचे अल्पसंख्यक मोर्चाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शेख जुम्मन रिझवी यांना दिनांक 10 सप्टेंबर रोजी नवभारत नवराष्ट्र च्या वतीने मराठी अस्मिता पुरस्कार 2022 ने महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक खात्याचे मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शुभहस्ते व मान्यवर अतिथिंच्या उपस्थितीत सम्मानित करण्यात आले.
गेल्या तीन दशकांपासून शेख जुम्मन रिझवी यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. गोरगरीब गरजु व उपेक्षित नागरिकांच्या उत्थानासाठी झटणारा त्यांच्या सुखदुःखात समरस होणारा युवा कार्यकर्ता म्हणून शेख जुम्मन रिझवी यांची ख्याती आहे. भाजपाचे शिर्षस्थानातील नेतृत्व राज्याचे वन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व ज्येष्ठ नेता चंदनसिंह चंदेल यांच्या तालमीतून तावून सुलाखून निघालेल्या शेख जुम्मन यांनी गेली २५ वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्राद्वारे सर्वसामान्यांच्या सेवेत वाहून घेण्याचे भरीव कार्य केले. एवढेच नव्हे तर कोरोना योद्धा व शेतकरी मित्र म्हणून त्यांनी उल्लेखनिय योगदान दिले आहे.
जात,धर्म व पंथाच्या पलीकडे जावून मुस्लिम समाजातील या युवकाने स्वयंस्फुर्तीने लोकांच्या सेवेला प्राधान्य देऊन जनसामान्यांमध्ये आपल्या सजग कार्यातून विश्वास संपादन केला आहे. महिलांना स्वयंसाहाय्यातून आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता यावी या उद्देशाने त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात ६०० हून अधिक महिला बचत गटांची उभारणी करून महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या सत्कार होणे ही सार्थक कार्याचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया मान्यवर अतिथींनी या सत्कार सोहळ्यास संबोधित करताना व्यक्त केली.
शेख जुम्मन रिझवी यांनी वेकोली प्रकल्प ग्रस्तांच्या न्याय लढयासाठी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या खांद्याला खांदा लावून गेली १५ वर्षे कार्य केले ही बाब सुद्धा त्यांच्या समाजाभिमुख कार्याची पावती आहे.
या सत्कार सोहळ्यास राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, प्रसिद्ध सिनेअभिनेते अतूल परचूरे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, नवभारत ग्रुप महाव्यवस्थापक शेखर चांदले, राहुल कविश्वर दैनिक नवराष्ट्र क्षेत्रीय व्यवस्थापक,प्रशांत विघ्नेश्वर दैनिक नवराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी, नवभारत जिल्हा संवाददाता संजय तावडे व अन्य मान्यवर अतिथी या कार्यक्रमास उपस्थित होते. अस्मिता पुरस्कारा बद्दल शेख जुम्मन रिझवी यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी जामा मशिदीचे सदर हाजी शेख उस्मान, मौलाना शमिउल कादरी, हरीषजी शर्मा माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, अहेतेशाम अली माजी नगराध्यक्ष वरोरा, बीजेपी शहरध्यक्ष काशीसिंह, ख्रिश्चन मोनीटरीचे गुडविल अलेक्सेंडर, ब्राह्मण समाजाचे दिनेश शितूत, अल्पसंख्याक महिला बचत गटाच्या संयोजक जिनत शेख, मराठा समाजाचे निलकंठ तीतरमारे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा महामंत्री शेख हुसेन शेख, युसूफ शेख, अझहर शेख यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.