अनिल अडकिने नागपुर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ६ मार्च:- श्री क्षेत्र वाकी येथे ३ मार्च पासून बाबांच्या ८१ व्या वार्षिक उर्सला सुरुवात झाली. ६ मार्च ला नागपूरचे श्रीमंत राजे रघुजी भोसले,श्रीमंत राजे मुधोजी भोसले, श्रीमंत राजे जयसिंग भोसले तसेच वाकी चे सज्जादा नशीन व संपूर्ण डहाके परिवार व ताजबागचे खादीम आणि भक्त परिवार यांच्या उपस्थितीत कुल चा कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच आज सिने अभिनेता तथा माजी खासदार राज बब्बर यांनी सुद्धा वाकी दरबारला भेट दिली.
७ मार्च ला सकाळी १० वाजता ह.भ. प. गणेश महाराज काळे आळंदीकर यांचे कीर्तन होईल.
८ मार्च ला प. पू.काशिनाथ नाना डहाके पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त वाकी दरबारातून सकाळी ९.३० वाजता संदल काढण्यात येईल त्यानंतर दरबारामध्ये ॲड. मिलींद केदार यांचे प्रवचन होईल. ९ मार्च ला ह.भ.प श्री महंत पुरुषोत्तमदादा महाराज पाटील आळंदीकर यांचे दही काल्याचे कीर्तनाने उर्साचा समारोप होईल.
यावेळी दररोज भाविकांना श्री क्षेत्र वाकी ट्रस्टतर्फे महाप्रसाद वितरित करण्यात येईल. यासाठी अन्नदान करणाऱ्यां दान दात्यानी ट्रस्ट सोबत संपर्क साधावा असे आव्हान अध्यक्ष प्रभाकर डहाके (पाटील), सचिव ज्ञानेश्वर डहाके (पाटील), विश्वस्त श्री. मधुकरजी टेकाडे, श्री.सचिन डांगोरे यांनी केले आहे.