अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ब्रिलियंट स्कूल हिंगणघाट येथे विद्यार्थी व पालक यांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात उत्कर्ष उन्नतीचा उत्सव कला संस्कृतीचा असा तीन दिवसाचा कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सव शाळेच्या मैदानावर पार पडला. या प्रसंगी डॉ. संजय दुधे उपकुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांनी विद्यार्थी जीवनात शिक्षणासोबतच स्वतःच्या कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी मिळाली तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर पडत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करावे आणि स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन केले. या प्रसंगी उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी संयोजक व संपूर्ण टीम आणि विद्यार्थिनींचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पांडुरंग तुळसकर संस्थापक अध्यक्ष विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट तर उद्घाटक म्हणून डॉ. संजय दुधे उपकुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, विशेष अतिथी म्हणून सतिश चाफले महामंत्री शिक्षण मंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, ॲड. इब्राहीम बक्ष अधिवक्ता हिंगणघाट, डॉ. उमेश तुळसकर सचिव विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट, डॉ. किशोरचंद्र रेवतकर प्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपुर, डॉ. नयना शिरभाते उपप्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपुर, डॉ. राजविलास कारमोरे, प्रा. मेघश्याम ढाकरे, डॉ. सपना जयस्वाल, प्राचार्य नितेश रोडे, ब्रिलीयंट स्कूल च्या मुख्याध्यापिका सविता साटोने यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. डॉ. उमेश तुळसकर यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांकरिता भविष्यकालीन नियोजनावर भाष्य करून विद्यार्थी हित व विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सूतोवाच केले. प्रसंगी स्कूल च्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून आपले कला गुण व कौशल्य सर्वांसमोर सादर केले. त्यामध्ये क्रीडा स्पर्धा घेण्यात आली, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशा नृत्याने झाली. मुलांनी नाटिका, तसेच गायन सादर केले. शेवटी आकर्षक ठरले ते ‘फॅशन शो’.
यानंतर मान्यवरांच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी गलांडे व कल्याणी झिलपे यांनी तर आभार वंदना राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्विते साठी सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर्वांनी सहकार्य केले.