मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून काही महिन्या अगोदर पोलीस प्रशासनाला काळीमा फासणारी घटना समोर आली होती. नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील माजी पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांनी अत्याचाराची परिसीमा गाठली होती.
जेव्हा पोलीस अधिकारीच हैवान होतो तेव्हा दाद मागावी तरी कुणाकडे? असा प्रश्न पडतो. अशीच एक धक्कादायक घटना हिंगणघाट पोलीस स्टेशन येथून समोर आली होती. पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध तक्रार देण्यास गेलेल्या एका 24 वर्षीय पीडितेची तक्रार न घेता तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करुन वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी हिंगणघाट पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत चव्हाण याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्राप्त माहितीनुसार, पीडिता मुलगी ही 5 ऑगस्ट 2021 रोजी हिंगणघाट पोलीस स्टेशन येते काही कारणास्तव तक्रार देण्यास गेली असता कर्तव्यावर असलेले पोलिस निरीक्षक संपत चव्हाण याने “तुझी मदत करतो, पण तु माझ्याशी मैत्री कर”, असं म्हटलं. पीडितेने नकार दिला असता चव्हाण याने “तुझी तक्रार मी घेणार नाही”, असं सांगितलं. पीडितेने “मी वरिष्ठांकडे तक्रार करेल”, असं म्हणत पोलीस ठाण्यातून निघाली. मात्र, 19 ऑगस्ट 2021 रोजी संपत चव्हाण रात्री 9 वाजता पीडितेच्या घरी गेला आणि धमकी देत “तक्रार नोंदवतो” असं सांगितलं.
बरेच दिवस उलटल्यानंतरही तक्रार न घेतल्याने पीडितेने पुन्हा चव्हाण याला तक्रार घेण्यासाठी सांगितले. मात्र, चव्हाण याने पीडितेला चक्क “तक्रार नोंदवायची असेल तर माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर”, असं म्हणत जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ठाणेदार चव्हाण याने ब्लॅकमेल करत वारंवार एप्रिल 2022 पर्यंत पीडितेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. अखेर पोलीस निरीक्षक संपत चव्हाण याच्याविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरुन अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षण आरोपी संपत चव्हाण हे प्रसार झाला होते. आरोपीनी अटकपूर्व जामीनासाठी हिंगणघाट कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली असता त्याचा जमीन अर्ज 24 मार्च रोजी फेटाळला असता आरोपीने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे धाव घेतली मात्र या घटनेला अनेक महिने होवूनही तपास अधिकारी यांना आरोपी सापडत नाही होता. शिवाय आरोपींनी पोलिसांच्या नाकावर टिचून घरगुती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केल्याची माहिती समोर येते होती.
पण अखेर ते मिळून आले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.