राजाराम येथील भगवंतराव अनुदानित आश्रम शाळेच्या आवारात बहादूर शिक्षकाने चक्क कॉपी लिहिताना मिळून आल्याने शाळेच्या परिसरात कोणाचाच वचक नाही.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- सध्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा सुरू आहे. परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येत आहे. ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करत असताना अहेरी तालुक्यातील राजाराम येथून कॉपी बहादर शिक्षकाचा प्रताप समोर आला आहे. त्यामुळे अहेरी तालुक्यात कॉपीमुक्त अभियानाला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
अहेरी तालुक्यातील राजाराम येथील भगवंतराव अनुदानित आश्रम शाळेत परीक्षा केंद्र असून या शाळेत एकूण 209 पैकी 185 विध्यार्थी परीक्षेला बसले होते. राजाराम भगवंतराव आश्राम शाळा केंद्र असून या केंद्रामध्ये एकूण 6 शाळेचे विद्यार्थी बसविले जाते. तर या शाळेमध्ये गुरुदेव आश्रम कमलापूकर, पोस्ट बेसिक शासकीय आश्रम शाळा गुड्डीगूडम, राजे धर्मराव आश्रम शाळा मन्नेराजाराम, राजे धर्मराव हायस्कूल मन्नेराजाराम, भगवंतराव हायस्कूल कमलापूर, भगवंतराव आश्राम शाळा उमानूर इत्यादी शाळेतील विध्यार्थी त्यांना बसविण्यात आले आहे.
राजाराम येथील भगवंतराव अनुदानित आश्रम शाळेत परीक्षा सुरू असताना शाळा परिसरात चक्क शिक्षकानेच कॉपी लिहितांना थेट मोबाईलमध्ये कैद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या कॉपी बाहादर शिक्षकाच्या प्रतापाने भविष्यात कॉपी मुक्त कधी होईल व विध्यार्थीत्यांना चांगले शिकणाचे धडे कधी मिळणार.