युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- सावनेर येथील नव्यानेच आलेले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांचा पत्रकाराच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विभागातील अनेक विषयावर सावनेर, खापा, खापरखेडा, केळवद, कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या क्राईम, सट्टापट्टी, क्लब, लॉज या संदर्भात विशेष चर्चा करण्यात आली.
सावनेर तालुक्यात गुन्हेगारीला आळा तर घालणारच, पण पुढील विषय निवडणुकीचा असल्यामुळे दारूला व गुन्हेगारीवर बारीक नजर व वचक निर्माण करणारच असे उद्दगार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांनी पत्रकारांसोबत चर्चा करतांना उद्गारले.
यावेळी स्टार महाराष्ट्राचे व महाराष्ट्र संदेश न्यूज चैनल चे विदर्भ ची ब्युरो युवराज मेश्राम, दैनिक लोकशाही वार्ता व विदर्भ कल्याणचे सावनेर प्रतिनिधी अनिल अडकिने व राष्ट्रवादी काँगेस सावनेर शहर अध्यक्ष राजूजी खांडे उपस्थित होते.

