✒️मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि
गडचिरोली:- जिल्हातील चामोर्शी तालुक्यातून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आष्टी-चामोर्शी मार्गावरील नाल्याजवळ झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना दिनांक 14 सप्टेंबर बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली.
विकास प्रकाश तिमाडे वय 26 वर्ष रा. अनखोडा ता चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून जखमी दुचाकीस्वाराला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हा अपघात नेमका कसा झाला हे कळू शकले नसून घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.