अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर- ९ मार्च:- सावनेर येथील ब्रह्मकुमारी सेंटर येथे झालेल्या पत्रकारांच्या मीडिया स्नेह मिलन बैठकीत ब्रह्मकुमारी आश्रमच्या मीडिया विंग माउंट आबू चे राष्ट्रीय संयोजक डॉ.शांतनूभाई यांनी देशात सुरू असलेल्या राज्याचा तसेच अघोषित आणीबाणी विषयी चिंता व्यक्त करीत पत्रकारांना मूल्यनिष्ठ समाज घडविण्याच्या दिशेने मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनीं सांगितले की सगळे पत्रकार समाजाचे चौथे आधार स्तंभाचे कार्य करित आहे.घरचा प्रत्येक व्यक्ती पत्रकार आहे.सामाजिक ,राजनीतिक घडामोडी इत्यादी विषयावर त्यांनी सकारात्मक पत्रकारितेची गरज असल्याचे सांगितले.
एखाद्या पत्रकाराने सत्यता जर बाहेर काढली तर ती त्याला धोक्याची घंटी आहे. काही पत्रकार पत्रकारितेच्या नावावर चाटुगिरी करतात. यांच्या मुळे पत्रकारिता बदनाम झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे ज्याला आपण नाकारू शकत नाही. जो पत्रकार आपल्या जीवावर खेळून सामाजिक विषमताला समोर आणण्याचा प्रयत्न करतो. त्याची आवाज दाबल्या जाते व त्याला आपला जीव सुद्धा गमावावा लागतो ही फार मोठी शोकांतिका आहे. असे विचार यानिमित्ताने ठेवत सर्व पत्रकार बांधवांना ब्रह्मकुमारी आंतरराष्ट्रीय मुख्यालय माउंट आबू येथे येण्याचे निमंत्रण दिले.
यावेळी सावनेर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले, डॉ.बी.के.शंतनुभाई, ब्रह्माकुमारी सेंटर सावनेरच्या संस्थापिका राज योगिनी सुरेखा दीदी तसेच पत्रकार तेजसिंग सावजी, दीपक कटारे, योगेश पाटील, पांडुरंग भोंगाडे, अनिल अडकिने, विजय पांडे, विजय टेकाडे, रितेश पाटील सह अनेक पत्रकार तसेच आश्रमच्या प्रियंका दीदी, अनिल ढवळे, विनोद मोरे, शशांक डांगोरे इत्यादींची उपस्थिती होती.