विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातीळ एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज (साेमवार) ला जारावंडी सह परिसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. आज जारावंडी करांनी आक्रोश मोर्चा काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या माेर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग हाेता.
या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी जारावंडी मुख्य चौकात रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती. तसेच जारावंडीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले हाेते.
आजच्या माेर्चात महिलांनी माेठ्या संख्येने सहभाग नाेंदविला आहे. यावेळी माेर्चेक-यांनी घाेषणाबाजी करत जारावंडी सह परिसर दणाणून साेडला. या दरम्यान देशाचे राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, राज्यपाल महाराष्ट्र शासन, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक याना निवेदन देऊन कठोर शिक्षेची मागणी केली आहे.