सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर :- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे आज चाइल्ड प्रोटेक्शन/ चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या बाबतीत मार्गदर्शन केल्या गेले. हा प्रकल्प दयानंद फाउंडेशन, मुंबई कडून राबविल्या जात आहे. मार्गदर्शन करताना श्री. नयन माली, मुंबई एनजीओ कोऑर्डिनेटर, श्री. प्रवीण डेव्हिड, एनजीओ चंद्रपूर डिव्हिजन, श्रीनिवास आणि श्री. विजय (टीम मेकर) उपस्थित होते.
या कार्यक्रमाची अध्यक्षता बी. बी. भगत सर मुख्याध्यापक, जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर यांनी केली, कार्यक्रमाचे संचालन आर. बी. आलाम सर सहाय्यक शिक्षक यांनी केले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना, नयन माली यांनी ” जीवन चांगले आहे?” यावर ध्यान केंद्रित केले. परंतु शाळेत जातांना आणि येतांना, तसेच मोबाईलवर चॅटिंग करत असताना, मोबाईलचे परिणाम आणि दुष्परिणाम, व्हिडिओ कॉल करत असताना, आपले संगत गुण, आदी बाबतीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन केले.
आपल्याला काही वैयक्तिक अडचण असल्यास 1098 वर काल करण्यासही सांगितले. मानवी तस्करीचा धंदा भारी प्रमाणात वाढलेला आहे. याबाबत जबाबदारी आपल्याच हाती आहे. विद्यार्थी जर याबाबतीकडे विशेष लक्ष देणार नाहीत, तर त्याचे वाईट परिणाम त्यांनाच भोगावे लागतील यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान करण्याची गरज आहे. असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात संबोधले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. वानखेडे सर, श्री. चव्हाण सर, सौ. लोधे मॅडम, श्री रांगणकर सर, श्री. भाले बाबू, श्री. कांबळे, श्री. खोंडे, श्री. मोरे श्री. अडबाले आदीसहित विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.
.