फलकाला काळे फासणाऱ्यांच्या शोध घेऊन कारवाई करा. नवरगांव येथील आंबेडकरी बांधवांची मागणी
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथील संविधान फलकाला काही जातीयवादी लोकाकडून हिरवा रंगाचा रंग लावून फलक विद्रुप केला होता. बौद्ध बांधवांच्या रिपोर्टनुसार चामोर्शी गडचिरोली व पोटेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. फलकाला पांढरा रंग लावून संविधान चौक या नावाचे नामफलक लिहुन फलकाला काळे फासणाऱ्या व्यक्तीचा कसुन तपास सुरु आहे.
अश्या प्रकारचे निच कृत्य करणे म्हणजे संविधान कर्त्याचा व प्रशासनाचा सुद्धा अपमान आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हटवून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकाच्या समक्ष नवरगाव येथील दोन्ही बाजुच्या लोकाकडून संविधान चौक असे ठरविण्यात आले. तोच दिड महिन्यात फलकाला काळे फासण्याचा प्रकार उघडकिस आला. तेव्हा असे कुत्य करणाऱ्यांना पोलीसानी पकडावे व बौद्ध बांधवांना न्याय मिळवून घ्यावा अशी मागणी डायमड वाकडे . कविश्वर झाडे ‘ प्रमोद गोवर्धन आदिनी केली असून नवरगांव गावाला रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे ‘ गडचिरोली जिल्हा रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर प्रत्यक्ष भेट देऊ बौद्ध बांधवाना मार्गदर्शन केले व SDPO ची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे .