विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधि
जळगाव:- मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने जळगाव एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण बागले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने यांच्या विरोधात मराठा समाजाच्या वतीने निषेध करुन जळगाव एलसीबी चे पोलीस निरीक्षक किरण भागले यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली व पोलीस निरीक्षक किरण बागले निषेध असो निषेध असो अशी घोषणाबाजी करण्यात आले.
चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पीआय अवतारसिंग चव्हाण यांनाही मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते एस बी पाटील, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. रोहन पाटील, संभाजी पाटील, प्रमोद बोरसे, दिव्यांग सावंत, धनंजय पाटील, शुभांगी पाटील, नीता पाटील, भारती बोरसे, अंजली देशमुख, जयश्री महाले, भारती साळुंखे यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी एक मराठा लाख मराठा समाजाचे अपमान करणाऱ्या बकालें ची बडतर्फ करा घोषणा देण्यात आल्या.