7 कोटी रुपयांचा सेवली येथे गावांतर्गत सिमेंट रस्त्याचे, रस्ता सावरगाव भागडे ते सेवली रुंदीकरणासह डांबरीकरण कामाचा लोणीकरांच्या हस्ते शुभारंभ
मंठा तालुक्यातील 3 कोटी 67 लक्ष रु चा कटाळा- पांगरी गोसावी धोंडी पिंपळगाव मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण रस्ता तर काकडा येथे 2 कोटी 35 लक्ष मुख्य रस्त्यावरील मोठ्या पुलाचे लोणीकरांच्या हस्ते उद्घाटन
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- रस्ते या विकासाच्या नाड्या असून रस्ते विकासाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी परतुर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण सातत्याने प्रयत्नशील असून या संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही डांबरीकरणाच्या या दर्जेदार रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यां साठी अत्यंत महत्त्व पूर्ण उपलब्ध झाल्या असून शेतकऱ्यांना बाजारपेठ लवकरात लवकर उपलब्ध झाली आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज केले सेवली येथे दर्जेदार सिमेंट काँक्रीट चा गावांतर्गत रस्ता, सावरगाव भागडे ते सेवली रस्ता रुंदीकरणा सह डांबरीकरणासाठी ०७ कोटी रुपयांचा रस्ता तर मंठा तालुक्यातील कटाळा पांगरी गोसावी पिंपळगाव या ०३ कोटी ६७ रस्त्यावरील काकडे जवळ ०२ कोटी ३५ लाख रुपयांचा मोठा पूल अशी एकूण 13 कोटी रुपयांची उद्घाटने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
यावेळी पुढे बोलताना लोणीकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत नेर सेवली हा परिसर मतदार संघाचा भाग नव्हता त्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती उपस्थित जनसमुदायाच्या समोर मांडली यावेळी बोलताना धारा उमरी सोनदेव पाष्टा कोळवाडी दरेगाव वरखेड एरंड वडगाव खांबेवाडी नागापूर मोहाडी पाथरूड शिवनगर यासह अनेक गावांना रस्ता उपलब्ध नव्हता याची आठवण करून दिली आता या सर्व गावांमध्ये डांबरीकरणाचे दर्जेदार रस्ते असून दळणवळणाची सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की मतदार संघातील प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न यापूर्वी देखील केला आहे यापुढे देखील करत राहणार आहे. परिसरातील प्रत्येक गावात गावांतर्गत सिमेंट रस्ते गाव तिथे सभामंडप ग्रामपंचायतची दर्जेदार कार्यालय दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ते तांडा सुधार योजनेअंतर्गत प्रत्येक तांड्यात सिमेंट काँक्रीटचे रस्ते दलित वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृह घरकुल योजना सिंचन विहीर शौचालय यासह अनेक लोक कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक गावाला आणि गावातील प्रत्येकाला मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील होतो आहे आणि यापुढे देखील राहणार असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी एडवोकेट उत्तमराव राठोड, नगरसेवक दीपक बोराडे, भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिव जिजाबाई जाधव, महेश पवार, बाळासाहेब मानकर, मोहनराव आढे, भास्कर राठोड, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विकास पालवे, सेवलीचे सरपंच अदिल पठाण, डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. शरद पालवे, विक्रम गोपाळ, विनोद राठोड, मंठा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रामकिसन बोडखे, सरपंच बाळासाहेब टकले, बाळासाहेब चव्हाण, दिगंबर जायभाय, सावरगाव भागडे येथील सरपंच उद्धव सानप, दिलीप जोशी, कोमल कुचेरीया, समाधान वाघमारे, प्रमोद भालेकर, सौरभ माहुरकर, बाबासाहेब भागडे, प्रभाकर गाढवे, कल्याण उबाळे, दत्तराव नरोडे, रामेश्वर काकडे, नंदू घोडे, संजय भालेराव, गणेश मोरे, नामदेव घेबड, सोनु कुरेवाड, महादेव काळे, गोविंद खरात, सचिन घाडगे, किशोर चव्हाण, सुभाष नरवडे, विशाल गीते, वाल्मीक बागडे, दिलीप डोळे, सुरेश राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री निवारे, शाखा अभियंता श्री सोनी, कंत्राटदार श्री अमित देशमुख, फरहान अन्सारी, ओंकारराव जाधव, पंडित राठोड, रामेश्वर चव्हाण, उत्तम मानकर, सतीश राठोड, कल्याण चव्हाण, बाळासाहेब लावनीकर, महेश चव्हाण, स्वप्निल चव्हाण, बाळासाहेब सावंत, लतीश शिंदे, राजू मोरे, संदीप शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती