मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील सगणापुर चांदेश्वर नवीन पुलाची निर्मित केव्हा होणार? नागरिकांचा उपस्थित प्रश्न कंत्राटदाराला अभय? : सगणापुर चांदेश्वर मार्गावरील प्रकार या चामोर्शी सार्वजनिक बांधकाम विभाग चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या सगणापुर- चांदेश्वर या डांबर रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्यासाठी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात दुरुस्ती झाली; पण ही दुरुस्ती हा थातूरमातूर करून नविन पुलाची निर्मित व रस्त्यावरील अनेक खड्डे कायम ठेवले. या मार्गाची न थातूरमातूर दुरुस्ती करून चामोर्शी हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संबंधित कंत्राटदाराला अभय न देत आहेत काय, असा सवाल परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.
चामोर्शी तालुक्यातील सगणापुर व चांदेश्वर तालुक्यांतील येणापुर या दरम्यान जोडणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग चामोर्शी अंतर्गत येतो. या मार्गाने शाळकरी विद्यार्थी व शेतकरी बांधव येणापुर व शेतात जात असतात . त्यामुळे या मार्गावर अल्पावधीतच ठिकठिकाणी खड्डे पडले असुन नवीन पुलाची निर्मित करावी. रस्त्याच्या डागडुजीचे काम चामोर्शी येथील एका कंत्राटदाराने केले आहे. परंतु नवीन पुलाची निर्मित कधी व केव्हा होणार असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
सगणापुर-चांदेश्वर या मार्गाची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. अर्धवट दुरुस्ती काय कामाची? या मार्गानी सगणापुर ते येणापुर लहान मोठे वाहतूक चालते. आता लहान खड्डेसुद्धा विस्तारत आहेत. रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहणार नाही. हा धोका टळण्यासाठी रस्त्यावरील लहान-मोठे सर्व खड्डे बुजविणे गरजेचे होते; परंतु या मार्गावर थातूरमातूर काम केल्याने लहान खड्डे कायम आहेत. बरेच खड्डे कायम असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करूनही काही उपयोग झाला नाही.
अर्धवट दुरुस्ती काय कामाची: या पुलाची अर्धवट दुरुस्ती काय कामाची असा सवाल करीत या कामाची चौकशी करावी, अशी प्रमोद झरकर नागरिकांची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या एका खासगी कंत्राटदाराला या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दिले. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे बुजवले; पण लहान खड्डे कायम ठेवले. त्यामुळे रहदारीसाठी यापूर्वी होणारा त्रास अजूनही कायम आहे.