✒️ पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे वारजे माळवाडी पोलीसांकडून ७० वर्षाच्या वृद्ध महिलेच्या खुनाची उकल अवघ्या काही तासात लावला आहे.
दिनांक १३ सप्टेंबर रोजी वारजे माळवाडी, पुणे याठिकाणी वयोवृद्ध महिला नामे सुलोचना डांगे वय ७० वर्षे हिचेवर वार करुन तीला जीवे ठार मारून जबरी चोरी केल्याची तक्रार प्राप्त झाल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाणे गु.र.नं ३४२ / २०२२ भा.द.वि कलम ३०२, ३९७, ४५२ प्रमाणे गुन्हा दाखल होता. वारजे माळवाडी पोलीसांना सदर घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर श्रीमती. पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर श्रीमती रुक्मिणी गलांडे यांनी घटनास्थळी भेट देवुन तपासात योग्य ते मार्गदर्शन केले.
पोलीसांनी वृद्धच्या नातेवाईकांकडे व आजुबाजुच्या रहिवाशाकडे चौकशी सुरू केली. त्या वृद्धसोबत तीचा मुलगा नाम सुनिल सुभाष डांगे ५२ वर्षे व नारा नामे गौरी सुनिल डांगे, वय २४ वर्षे हे दोघेच राहत असल्याने त्यांच्याकडील विचारपूस दरम्यान तिची नात नागे गौरी हिये वर्जन व माहिती पोलीसांच्या नजरेस संशयास्पद वाटल्याने तिच्याकडे बारकाईने चौकशी केली. गौरी हिने स्वतःचे खर्चासाठी ऑनलाईन लोन अॅपद्वारे कर्ज घेतले होते ते कर्ज अल्पावधीत भरण्यासाठी त्या अॅपचे धारकांकडून तगादा लावला गेल्याने तिने एका मागून एक वेग-वेगळ्या लोन अॅप कडून कर्ज उचलली आहेत त्यासाठी तिला लोन अॅप कंपन्याकडून कर्ज वसूलीसाठी धमकीचे मॅसेजेस व कॉल येवू लागल्याने व तिच्याकडे पैसे किंवा दागिने नसल्याने घरात झोपलेल्या आजीच्या तोंडावर उशी दाबून व घरातील ब्लेड व स्क्रू ड्रायव्हरने जखमा करून तीचा निघृण खून केला आहे. त्यानंतर तीचे गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने काढून घेवून तिने सोनाराकडे विकून लोन अॅपचे कर्ज फेडल्याचे सांगितले आहे दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री दत्ताराम बागवे, वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. राजेद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती पौर्णिमा गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा श्रीमती रुक्मिणी गलांडे, सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर, वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वपोनि शंकर खटके, पोनि (गुन्हे), वचाराम बागवे, सपोनि बामु रायकर, पोउपनिरी नरेंद्र मुंढे, पोउपनिरी. रामेश्वर पावे, पोउपनिरी अमोल सावंत, पोउपनिरी. जनार्धन होळकर, पोउपनिरी मनोज बागल, पोउपनिरी यशवंत पडवळे, पोउपनिरी चंद्रकांत जवळगी, पोउपनिरी मंदार शिंदे, मपोउपनिरी तृप्ती पाटील, मपोउपनिरी स्नेहल जाएय तसेच पोलीस अंमलदार गोविंद फर प्रदिप शेलार, हनमंत मासाळ, धनजय गिरीगोसावी, नितीन कातुर्डे, ज्ञानेश्वर गुजर, गोविंद कपाटे, अजय कामडे, विजय मरुक, नंदकिशोर चव्हाण, विक्रम खिलारी, श्रीकांत भांगरे, हेमंत रोकडे, पांडुरंग भोग, सुमित बोरकर यांनी केली आहे.