संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- आज देवराव दादा भोंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर यांनी राजुरा तालुक्यातील मौजा बाबापुर, धिडशी, कढोली, शांतिनगर (वरोडा) आणि सातरी या गावांना भेटी देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांसह विविध विकासकामांचे भुमिपुजन व लोकार्पण केले.
यामध्ये बाबापुर येथे मंजूर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे, धिडशी येथे तांडा वस्ती योजनेअंतर्गत मंजुर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमिपुजन व अंगणवाडीचे लोकार्पण, कढोली येथे मंजुर बंदिस्त नाली बांधकामाचे तर शांतीनगर वरोडा येथे सीमेंट क्राँक्रिट रस्त्याचे आणि सातरी येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सीमेंट क्राँक्रिट रस्त्याच्या कामाच्या भुमिपुजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव दादा भोंगळे याच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी देवराव दादा भोंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर यांचे ठिकठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी आनंदात स्वागत केले. त्यांचेशी हितगुज करत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण ही केले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, अनंता येरणे, विनोद नरेन्दुलवार, छबिलाल नाईक, दिपक झाडे, आकाश गंधारे, राजेंद्र गौरकार, सुभाष आत्राम, प्रशांत वराडकर, मंगला आत्राम, शत्रुघ्न पेटकर, रमेश पिंपळशेंडे, विरेंद्र पुणेकर, धिडशी च्या सरपंचा रिता हनुमंते, उपसरपंचा राहुल सपाट, संतोष काकडे, संधुबाई निखाडे, वसंता कोरडे, मधुकर कोरडे, वासुदेव निखाडे, नरेश ढुमणे, नामदेव निखाडे, रामदास ढुमणे, कढोलीचे सरपंच शैलेश चटके, उपसरपंचा सुषमा उरकुडे, रंजना हिंगाणे, दत्तात्रय हिंगाणे, संजय किंगरे, प्रतिभा मोरे, मिता पडवेकर, राकेश हिंगाणे, राकेश पिंपळकर, बापुजी अडबाले, विठोबा खांडारकर, शांतीनगर येथील वनमाला कातकर, सुनील वांढरे, पिराजी बसवंते, नारायण निलावार, नामदेव आसुटकर, अजय निलावार, बापुराव कोटनाके, रत्नाकर टेकाम, महादेव बसवंते, सातरीच्या सरपंचा पद्मा वाघमारे, भाऊराव बोबडे, गणेश वाघमारे, अभिजित कोंडावार आदिंसह नागरिकांची ठिकठिकाणी उपस्थिती होती.