पालघर शहर प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पालघर:- येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या कारागृहाच्या बांधकामाचे भुमीपुजन राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 14 मार्च रोजी संपन्न झाले. यावेळी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, अमिताभ गुप्ता व कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग मुंबई, योगेश देसाई उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदी बंदीस्त असल्याने महाराष्ट्र शासनाने राज्यात विविध ठिकाणी नवीन कारागृहे बांधण्याचे नियोजिले आहे त्यानुसार ठाणे मध्यवती कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह वर्ग-1 येथील कारागृहातील बंद्यांची अतिगर्दी विचारात घेता पालघर येथे नवीन मध्यवर्ती कारागृह बांधण्याचे प्रस्तावित होते त्यासाठी शासनाने 25 एकर जागा उपलब्ध करुन दिली. या जागेवर मध्यवर्ती दर्जाचे कारागृह बांधले जाणार असून त्याची बंदीक्षमता 1500 एवढो असणार आहे. सदर कारागृहाचे बांधकाम पोलोस गृह निर्माण महामंडळ यांचे मार्फत होणार असून त्यासाठी रु. 418.82 कोटी इतक्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कारागृहामुळे ठाणे मध्यवर्ती कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह वर्ग-1 येथील बंद्यांची अतिगर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.