रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- मंठा तालुक्यातील उंबरखेड येथे दिनांक 17 मार्च रोज रविवार या दिवशी मंठा तालुक्यातील सर्वात मोठी ऐतिहासिक धम्म परिषद पार पडली. या धम्म परिषदेचे आयोजन वैजंतीमाला शिवविलास सोनकांबळे या परिवारातर्फे केले होते. या धम्म परिषदेची सुरुवात मंठा येथील विडोळी फाट्या पासून ते उमरखेडा जवळ जवळ 5/6 किलो मिटर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या भव्य अष्ट धातूच्या मूर्तीने धम्म रॅली ने झाली झाली. या धम्म रॅलीला 20 हजारच्या वर धम्म बांधन उपस्थित होते.
उंबरखेड या गावांमध्ये भव्य असं बौद्ध विहार उभारण्यात आला आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुद्धा अनावरण करण्यात आला. आहे. या नवीन विहारांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची अष्ट धातूचे चार क्विंटल वजनाची मूर्ती या नवीन बुद्ध विहारांमध्ये स्थापन करण्यात आली. हे विहार विद्यार्थी घडवण्याचं काम भविष्यामध्ये करेल. या संपूर्ण कार्यक्रमाला सोनकांबळे परिवाराला जवळपास 50 लाखाच्या जवळ खर्च लागला आहे. आजपर्यंत सहा बुद्ध विहार हे स्वखर्चातून सोनकांबळे परिवारांनी बांधली आहेत. भविष्यात 28 बुद्ध विहार बांधण्याचा निर्धार या सोनकांबळे परिवाराने केला आहे. या धम्म परिषदेचे स्वागत अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे मंठा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव हे होते. तालुक्यातील धम्म बांधवांचे जर सहकार्य असेल तर प्रत्येक वर्षी ही बौद्ध धर्म परिषद उंबरखेडा गावामध्ये आम्ही करू असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिले या उंबरखेडा गावातील विहाराच्या सुशोभीकरणाला कंपाऊंडसाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करून देण्याचं काम करेल अशी आश्वासन विधानपरिषद आमदार राजेश राठोड यांनी दिले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष दळवी साहेब, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जालना जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, वंचित बहुजन आघाडी महासचिव डॉ.किशोर त्रिभवन, जालना जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, परतूर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर व तसेच जालना जिल्ह्यातील व मंठा तालुक्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.