पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दि. १८ मार्च:- सूधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागचे ब्रीद असुन त्या अनुषंगाने नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे बंद्याकरिता विविध प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.तसेच बंद्याचे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरीता कारागृह प्रशासन नेहमीच दक्ष असते. बंद्याकरीता विविध सामाजिक संस्थाच्या माध्यामतून कारागृहात विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. त्यामध्ये महिला बंद्याकरीता अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन प्रयास टाटा सामाजिक विद्यान संस्थान मुंबई यांच्या समन्वयातून भारतीय सेवक संगती यांच्या मार्फत दिनांक १८ मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सदर शिबीरा मध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ.नेहा गोडघाटे यांनीं एकूण ६६ महिला बंदीची तपासणी करून औषधी देण्यात आले. या शिबिरास कारागृहाचे अधीक्षक श्री.वैभव आगे, उपअधीक्षक श्रीमती दिपा आगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्री.आनंद पानसरे, भारतीय सेवक संगती संस्थेचे समन्वय श्रीमती रिता काटे, प्रयास सामाजिक कार्यकर्ता श्रीमती मीना लाटकर,श्रीमती अरुणा मोहड महिला शि. व ईतर प्रामुख्याने उपस्थित होते.
(वैभव आगे) अधीक्षक नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर
प्रती,
१. मा.जिल्हा माहिती व संपर्क अधिकारी नागपूर विभाग,नागपूर
२. संपादक सर्व वर्तमान पत्र नागपूर विभाग, नागपूर
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करावी हि विनंती