श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- पृथ्वीतलावरील सर्व प्रजातींच्या अस्तित्वासाठी पाण्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे याचे महत्त्व पटवून देणे व बाबतची जनजागृती करणे यासाठी 22 मार्च रोजी जागतिक जल दिवस साजरा केला जातो.
आदित्य शिक्षण संस्था संचालिका तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कार्यकारिणी सदस्या डॉ आदितीजी सारडा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि आदित्य अन्न तंत्र महाविद्यालय बीडचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री श्यामजी भुतडा सर यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक जल दिवस साजरा करण्यात आला.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाणी किती महत्त्वाचे आहे हे सांगताना प्राचार्यांनी जल है तो कल है या शब्दात विद्यार्थ्यांना संबोधित केले. तसेच पृथ्वीच्या भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली असून दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन हे शहर जगातील पहिले पाणी नसलेले शहर बनलेले आहे याबाबत देखील प्राचार्य श्री श्यामजी भुतडा सर यांनी सांगितले. संपूर्ण भारत देशामध्ये साधारण 63% इतका तरुण वर्ग असून सध्याचा तरुण वर्ग हा जल संवर्धनासाठी उपयुक्त ठरू शकतो व व प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवशी कमीत कमी एक तरी झाड लावावे याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले.
जागतिक जल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य पुढे म्हणाले की एक कडुनिंबाचे झाड जर आपण लावले तर ते झाड पूर्ण सीझनमध्ये दहा हजार लिटर पाणी जमिनीमध्ये घेऊन जाऊ शकते तसेच जर एक वटवृक्षाचे झाड आपण लावले तर ते झाड पूर्ण सीझनमध्ये साधारणतः एक कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये घेऊन जाऊ शकते. त्यामुळे पृथ्वीच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. त्यामुळे, झाडे झाडे लावा, झाडे जगवा आणि झाडे जोपासा हाच नारा येत्या काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जागतिक जलदिवस इतक्या उत्साहात साजरा केल्याचे पाहून संस्थेच्या संचालिका तथा कार्यकारी सदस्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी डॉ. आदितीजी सारडा मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. पाण्याचे महत्त्व समजून सांगताना मॅडमजी म्हणाल्या, संपूर्ण जग हे पाण्यावर अवलंबून आहे आणि जगाची सुरुवात ही पाण्याच्या एका थेंबापासूनच झालेली आहे. पुढे बोलताना मॅडमजींनी अतिशय प्रेरक अशी पाणी निर्मितीची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली. याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, की पाण्याची बचत आणि पाण्याचा योग्य तो वापर म्हणजेच पाणी निर्मिती होय आणि पाणी निर्मितीसाठी प्रत्येकाने योग्य ती ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच सध्याचे बदलते हवामान पाहता जास्तीत जास्त झाडांची संख्या आपल्या अवतीभोवती वाढवणे आणि त्यांची जोपासना करणे हाच एक जलसंवर्धनासाठीचा उत्तम पर्याय ठरणार आहे. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तसेच वृक्ष लागवडीसाठी योग्य ते उपक्रम आदित्य शिक्षण संस्था येत्या काळात राबवेल असे आश्वासनदेखील डॉ. आदितीजी सारडा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिले.
तसेच जल संवर्धनासाठी आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व आदित्य अन्न तंत्र महाविद्यालय सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या वतीने जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन देखील केले.