उषाताई कांबळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- मेहकर तथागत बहुऊद्देशीय संस्था मेहकर रजि-नं. MH79/2020 F-18654 द्वारा संचालित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने 31 मे 2024 रोजी मेहकर शहरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पोलीस स्टेशन समोर मेहकर येथे राजस्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तथागत बहुऊद्देशीय संस्था मेहकर द्वारा संचालित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधवांना कळविण्यात येते की, तथागत बहुऊद्देशीय संस्था मेहकर द्वारा संचालित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने 31 मे 2024 रोजी मेहकर शहरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पोलीस स्टेशन समोर मेहकर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व समाजातील लोकांचा अनाठाई खर्च होणे व त्यासाठी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी व समाजातील ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अश्या कुटुंबातील नव वधूवरांना सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात भाग घेता यावा व सर्व स्तरातील समाज एकत्र यावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून समाजातील जास्तीत जास्त नववधू वरांच्या पालकांनी या सोहळ्यात सहभाग घेऊन दिनांक 10 मे 2024 पर्यंत आपली नावे तथागत ग्रुप जनसंपर्क कार्यालय मेहकर येथे संपर्क क्रमांक 9970467141, 9881199852 यानंबर वर फोन करुन आपली नाव नोंदणी करावी.
नाव नोंदणीसाठी कागदपत्रे
1) रहिवासी प्रमाणपत्र.
2) जातीचे प्रमाणपत्र
3) दोन पासपोर्ट फोटो
4) 100 च्या बॉंड शपथपत्र
असे कागदपत्र घेऊन यावे असे आव्हान तथागत बहुऊद्देशीय संस्था मेहकर द्वारा संचालित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांनी केले आहे.