पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये सद्यस्थितीत सरासरी ६७०० बंदी विविध खटल्यामध्ये दाखल आहेत. दाखल बंदी संख्या लक्षात घेता, बंद्यांच्या भेटीसाठी येणा-या नातेवाईक व वकीलांची दैनंदीन संख्या जवळपास १४०० ते १५०० इतकी आहे. त्यानुसार भेटीस नातेवाईक व वकील यांचेसाठी सर्व सोई-सुविधा उक्त प्रतिक्षालय असणे आवश्यक होते.
त्यानुसार अमिताभ गुप्ता (भापोसे) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे व डॉ. जालिंदर सुपेकर (भापोसे) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व श्रीमती. स्वाती साठे कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सायबेज आशा ट्रस्ट, पुणे या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यांच्या भेटीला येणा-या नातेवाईक व वकील यांचेसाठी आत्याधुनिक सुसज्ज सोई – सुविधायुक्त प्रतिक्षालयाचे बांधकाम भूमिपुजन सोहळा दि.२३ मार्च रोजी अरुण नथानी मुख्य कार्यकारी अधिकारी सायवेज व श्रीमती. रितू नथानी, संचालिका सायवेज यांचे शुभहस्ते पार पडला. तसेच यापूर्वी सायबेज आशा ट्रस्ट यांचेमार्फत महिला बंदी व कारागृह महिला कर्मचारी यांचे मुलांसाठी ” नन्हे कदम” बालवाडी व ” हिरकणी कक्ष येथे संरक्षक भिंतीचे कुंपन व बगीचा यांचे बांधकाम करण्यात आले होते, तेथे देखील पाहणी करण्यात आली.
सदर भुमिपूजन सोहळ्यास सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक श्रीमती. पी. पी. कदम, एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. सी. आर सांगळे, बांधकाम तुरुंगाधिकारी, श्री. शिवाजी पाटील, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, सायवेज सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.