अनिल अडकिने नागपुर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २७ मार्च:- नागपूर येथील ताजधाम पागलखाना शरीफ येथील हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या सालांना उर्स २९ मार्च पासून सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाकी दरबार ट्रस्ट कडून ताजधाम पागलखाना नागपूर येथील हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या सालाना उर्स निमित्त २९ मार्च ला शाही संदल काढण्यात येत आहे.
२९ मार्च ला सकाळी १० वाजता वाकी दरबार येथून शाही संदल निघून ताजधाम पागलखाना नागपूर येथील वाकी दरबार यांच्या डेऱ्यावरती पोहोचेल. तिथे कव्वालीचा कार्यक्रम होऊन तेथून ठीक ५ वा. ताजधाम दरबार कडे निघेल दरबारामध्ये पोचून बाबांना चादर फुल अत्तर अर्पण करून सर्व भक्तांसाठी प्रार्थना करण्यात येईल व नंतर महाप्रसादाचे वितरण होईल.
रोज ३०,३१ मार्चला सकाळी ९ वा. नाश्ता चहा वितरण होईल व दुपारी महाप्रसादाचे वितरण होईल.
यावेळी सर्व भक्तांनी या शाहीसंदल मध्ये शामिल होऊन बाबासाहेबांचा आशीर्वाद घ्यावा असे आव्हान ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जादा नशीन श्री. प्रभाकरजी डहाके पाटील यांनी केले.

