उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- स्वामिनी विधवा विकास मंडळ अकोला तसेच स्वामिनी संघटना अकोला यांच्या वतीने आईच्या नावाचा सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये तसेच शासकीय पाट्यांवर उल्लेख करावा, अशी मागणी २००४ पासुन करण्यात आली होती. सदर मागणी शासणाने पुर्ण करित तसा शासन आदेश सुद्धा काढला आहे. पण बर्याच कार्यालयात सदर बाब गांभीर्यपूर्वक घेतली जात नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले.
शासनाने सदर मागणी पूर्ण केल्याबद्दल प्रथमतः शासनाचे धन्यवाद संघटनेने माणले. शासनाने महिला धोरणामध्ये समावेश करून घेतलेल्या निर्णयानुसार आईचे नाव सर्व शासकीय, निमशासकीय तसेच न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्यासह सर्वांना आईच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात यावे तसेच शासकीय पाट्या सुद्धा बदलून घ्याव्यात, शासकीय निवासस्थानांवर नाव बदलाची कारवाई ही तातडीने करीत या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, अशी मागणी केली आहे.