उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:– पोलीस विभागातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाणी पिल्यामुळे अचानक तब्येत बिघडली यात तब्बल 60 पेक्षा जास्त महिला पोलिसांची प्रकृती बिघडल्याची घटना शुक्रवारी घडली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
दूषित पाणी पिल्यामुळे अचानक अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मळमळ आणि उलट्या होत होत्या. त्यांना सुरुवातीला शासकीय रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल केले. सुमारे 60 पेक्षा जास्त महिला पोलिसांची प्रकृती बिघडली असून काहींना प्रथमोपचार करून परत पाठवण्यात आले आहे.
दूषित पाणी प्राशन केल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांची प्रकृती बिघडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. काहींना उन्हाचादेखील फटका बसला. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.