युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- मध्यवर्ती कारागृहात हत्या केल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
2 मार्च 2007 रोजी अरुण गवळीला याने शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केली होती या प्रकरणात अरुण गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांनी 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे आपल्या सुटकेची मागणी केली होती. तशी याचिका देखील नागपूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर खंडपीठाने मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले आहेत. अरुण गवळी यांच्या याचिके प्रकरणी नागपूर खंडपीठात याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता. दरम्यान अरुण गवळी यांची सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
काय आहे शासन निर्णय: 10 जानेवारी 2006 रोजीच्या शासन निर्णयामध्ये वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. याचा आधार घेत गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. विविध शारीरिक आजार जडले आहेत. निम्मा कारावासही भोगला आहे. त्यामुळे कारागृहातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती गवळीने केली होती. या प्रकरणात गृह विभाग आणि इतर प्रतिवाद्यांना हरकती घेण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.