Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुलीने लग्न करण्यास नकार दिल्याने आई, भाऊ आणि मामाने केली तरुणीची हत्या, कोल्हापूर मध्ये खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 5, 2024
in क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुलीने लग्न करण्यास नकार दिल्याने आई, भाऊ आणि मामाने केली तरुणीची हत्या, कोल्हापूर मध्ये खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोल्हापूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अशा. येथे प्रेमसंबंध असलेल्या तरुणाबरोबर लग्न कर किंवा प्रेमसंबंध तोडून टाक, असे वारंवार सांगूनही ऐकत नसल्याच्या रागातून आई, भाऊ आणि मामाने मिळून एका तरुणीला बेदम मारहाण केली त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार वय 24 वर्ष, रा. शनिवार पेठ असे या मृतक तरुणीचे नाव आहे.

बुधवारी मध्यरात्री उशिरापर्यंत आई, भाऊ आणि मामाने मिळून मृतक वैष्णवी हिला सळी, काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळी गंभीर जखमी अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर ही हत्येची गंभीर घटना उघडकीस आली.

याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आई शुभांगी लक्ष्मण पोवार, भाऊ श्रीधर पोवार (दोघे रा. शनिवार पेठ), संतोष बबन आडसुळे (मूळ रा. इचलकरंजी, सध्या रा. देवठाणे, ता. पन्हाळा) यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शनिवार पेठेतील पोवार कुटुंबीयांचे पापाची तिकटी येथे चप्पलचे दुकान आहे. या कुटुंबातील वैष्णवी हिचे पुण्यातील वैभव शेळके (रा. कात्रज) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. वैष्णवी हिच्या आईला या प्रेमसंबंधाची माहिती होती. बुधवारी सकाळी मुलीला घेऊन शुभांगी या पुणे येथे मुलाच्या घरी गेल्या होत्या. तुम्ही दोघे लग्न करा किंवा तुमचे प्रेमसंबंध तोडा, असे त्या वैैष्णवी आणि वैभव यांना वारंवार सांगत होत्या. यावरून त्यांच्यात वादही होत होता. परंतु वैष्णवी आणि वैभव हे दोघेही लग्न करायला तयार नव्हते. त्यांना रिलेशनशिपमध्ये मात्र राहायचे होते. मुलीचे हे विचार आईला पसंत नव्हते. बुधवारी दुपारी ते पुण्याहून कोल्हापूरकडे आले. रात्री कोल्हापुरात पोहोचल्यानंतर वैष्णवी आणि मुलगा श्रीधरला घेऊन शुभांगी या भाऊ बबन आडसुळे यांच्या देवठाणे (ता. पन्हाळा) येथील घरी गेल्या. वैष्णवीला तिथेही समजावण्याचा प्रयत्न केला. वैष्णवी ऐकायला तयार नसल्याने आई शुभांगी यांनी तिला बेदम मारहाण केली. काठी, सळीने केलेल्या मारहाणीमुळे वैष्णवी गंभीर जखमी अवस्थेत पडली. गुरुवारी सकाळी तिला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात आणले असता उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. बेदम मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी आई, भाऊ आणि मामावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या खुनाची फिर्याद सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील यांनी दिली आहे. तिघांना अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर शनिवार पेठ आणि परिसरात एकच खळबळ माजली. गुरुवारी रात्री वैष्णवीवर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: कोल्हापूर जिल्हाकोल्हापूर तरुणीची हत्याकोल्हापूर पोलीसमुलीची हत्याहत्या
Previous Post

हिरडव येथे संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण.

Next Post

नागपूर: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश.

नागपूर: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In