बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- जेष्ठ कवी/लेखक आनंद पारगावकर (मुंबई ) यांना मौजे हिरडव, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथे रविवारी आयोजित केलेल्या मराठी साहित्य मंडळ च्या 6 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘साहित्य भूषण ‘ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या ‘आनंदह’ या आनंदह संग्रह पुस्तकाला दिला गेला आहे.
या सोबतच लेखिका ज्योतीताई किरतकूडवे (साबळे) यांना त्यांच्या ‘तिची नजर (एक रहस्य कथा)’ या पुस्तकाला राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. इत्यादी लेखक, कवींना वेगवेगळया पुरस्काराने गौरविण्यात आले.
या प्रसंगी उपस्तिथ डॉ. जयप्रकाश घुमटकर, (राष्ट्रीय अध्यक्ष – मराठी साहित्य मंडळ), जेष्ठ कवी मा. डी. आर. बांगर, सुभाष भवार, आर्यन किरतकूडवे व मनोज लहाने (शारा), आणि साहित्य क्षेत्रातील अनेक कवी व कवियत्री उपस्थित होते.

