अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटचे वतीने दिनांक ७ एप्रिल रोजी स्थानिक बन्सीलाल कटारिया रत्ना विद्यानिकेतन शाळेत भव्य रक्तदान शिबिर व वैद्यकीय साहित्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून लगेच रक्तदान शिबिरास सुरुवात होईल. त्याचप्रमाणे नारायण सेवा मित्र परिवाराच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत रुग्णांकरीता मेडिकल बेड, व्हीलचेअर, एअरबेड, कमोड चेअर या साहित्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अपंग रुग्णांकरीता तीन चाकी सायकलचे सुद्धा वितरण करण्यात येणार आहे.
तरी सदर रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे. असे आवाहन नारायण सेवा मित्र परिवार चे अध्यक्ष महेश अग्रवाल, सचिव पराग मुडे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.