मुंबई इथे माननीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार सोहळा पार
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली;- सामाजिक कार्यकर्ता सुनीता चांदेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रेंदिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सन्मान महाराष्ट्रचा गौरव आदर्श समाजसेवकाचा अतिदुर्गम भागातील सेवावृत्तीचा सन्मान पुरस्कार सोहळा सर्वसामान्य नागरिकांचा न्याय हक्कासाठी महिला, बालीका यांच्यावर होणारे अन्याय, छेडछाड, बलात्कार, अत्याचार, सतत लढणारे एकमेव सामाजिक क्षेत्रात सतत कार्य करणारे सुखा दुःखात जाऊन नेहमी सहकार्य करणारे सुनीता चांदेकर यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र मुंबई शासनाच्या वतीने देवुन गौरविण्यात आले.