आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार वर्धा जिल्ह्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यात दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मात्र ढगाळ वातावरणामुळे वाढत्या उष्णतामानापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात काही भागात 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहण्यास मिळाले. वर्धा जिल्ह्यासह विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार वर्धा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून दुपारच्या वेळी पावसाळा सुरवात झाली. काही भागात विजांच्या कडकडाटासह तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला.
आज सकाळपासून ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. काही शेतकऱ्यांनी गहू सवंगणी करून ठेवलं आहे. तर काही शेतकरी गहू काढत आहे. यामुळे अचानक आलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील तीन दिवस हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे वाढत्या उष्णतामानापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

