देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- वानाडोंगरी-हिंगणा या मुख्य रस्त्यावरच महाजनवाडी परिसरात एक वर्षापूर्वी सुरु झालेले क्वालीटी वाइन शाॕप त्वरीत बंद करण्यात यावे. यासाठी महाजनवाडी महिला संघर्ष समीतीच्या वतीने आज दि.८ एप्रिलला जिल्हाधिकारी नागपूर तसेच अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नागपूर यांना निवेदन देण्यात आले.
क्वालिटी वाईन शॉप ज्या जागेवर सुरु करण्यात आले. ती जागाच अनधिकृत आहे. त्यामुळे कोर्टाचा अवमान झाला. नगरपरिषद वानाडोंगरी कडून अनधिकृत रित्या फेरफार करण्यात आले व निबंधक कार्यालयात सुद्धा खोटे दस्तऐवज लावून रजिस्ट्री करण्यात आली. क्वालिटी वाईन शॉप हे रहदारीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे तिथे खूप गर्दी होते आणी तिथेच ऐन येण्याजाण्याच्या रस्त्यावर आपली वाहने उभी करुन दारु प्राशन करतात. दारूच्या व पाण्याच्या रिकाम्या शिशा तिथेच रस्त्यावर फेकतात. आणी खुल्यावर उभे राहुन लगवी सुद्धा करतात. त्यामुळे महिला, शालेय मुली व इतर नागरिकांना फारच त्रास होत आहे.
दारु दुकानासमोर दुचाकी व चारचाकी वाहनांची ऐन रस्त्यावर खूप गर्दी होते .त्यामुळे खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. वाईन शॉप करिता तेथील नागरिकांची कोणतीही परवानगी न घेता या दारु दुकानाला नगरपरिषद कार्यालयाच्या तत्कालीन नगरसेवक, पदाधिकारी व अधिकरी यांनी फारमोठ्या प्रमाणात देवानघेवान करुन ना हरकत प्रमाण पत्र दिलेले आहे. तेंव्हा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय येथील जबाबदार अधिकरी यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन हे क्वालीटी वाइन शाॕप बंद करण्यात यावे किंवा इतरत्र स्थानांतरीत करण्यात यावे. अन्यथा तिव्र आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा महिलांनी दिलेला आहे.
याप्रसंगी सौं ज्योती चौधरी, मीनाक्षी उमाळे, अर्चना पडघन, कांचन शहाकार, पूनम गावंडे, लता गुडधे, लता सांभारे, वर्षा नागोसे, माधुरी खानकुळे, सरला गोडे, चित्राताई शिंदे व असंख्य महिला उपस्थित होत्या.