अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रीय भूमापन दिवशी शहराच्या बसस्थानक परिसरातील ले.कर्नल विलियम लॅम्बटन यांचा स्मारकाला पुष्प चक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
ले.कर्नल विलियम लॅम्बटन यांनी १० एप्रिल १८०२ ला मद्रास (चेन्नई) येथील मरीना बीच पासून त्रिकोणमितिय सर्वेक्षणाला सुरुवात केली. म्हणून १० एप्रिल हा दिवस भारतीय राष्ट्रीय भूमापन दिवस म्हणून साजरा करतात. महान भारतीय त्रिकोनमितिय सर्वेक्षण हे जगातील सर्वात मोठे भूमापन सर्वेक्षण होते. विलियम लॅम्बटन याचा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केल्या नंतर मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी प्रविण कडू यांनी आपल्या भाषणात त्रिकोणमितिय सर्वेक्षणातून संपूर्ण देशात समुद्र सपाटी पासून उंचीचा संदर्भ म्हणून बेंचमार्क स्थापित करण्यात आले. हे बेंचमार्क स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरीग) मध्ये अत्यंत उपयोगाचे आहे. आज काळाचा ओघात दुर्लक्षामुळे बहुतांश बेंचमार्क नष्ट झाले आहे. हे बेंचमार्क प्रत्येक रेल्वे स्टेशनवर स्थापित करण्यात आले आहे. हिंगणघाट येथील रेल्वे स्टेशन वरील बेंचमार्क काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळाली. इतर रेल्वे स्टेशनवर शोध घेतला असता सोनेगाव (धोत्रा) रेल्वे स्टेशनवर बेंचमार्क शोधन्यात यश आले. तसेच वरोरा रेल्वे स्टेशनवर सुध्दा बेंचमार्क शोधण्यात आला आहे. या शोध कार्यात प्रविण चरडे, राजेंद्र मर्दाने पत्रकार वरोरा यांनी सुध्दा सहभाग घेतला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एड राजेंद्र डागा यांनी राष्ट्रीय भुमापन दिवसाच्या संदर्भात विस्तृत माहिती विषद केली. आभार यशवंत गडवर यांनी मानले. या कार्यक्रमाला माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष पुंडलिक बकाणे, हेमंत कुळकर्णी, राजेराम कावळे, निसर्गसाथी फाउंडेशन चे कोषाध्यक्ष प्रभाकर कोळसे, मनोज गायधने, यशवंत गडवार, वासुदेव पडवे आदीची उपस्थिती होती.
राष्ट्रीय भुमापन दिन निमित्ताने परिसरात अडगळीत पडलेले बेंचमार्क निसर्गसाथी फाउंडेशननी शोधून काढले यात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्थानकावरील बेंचमार्क, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव रेल्वेस्थानका वरील बेंचमार्क, आणि हिंगणघाट शहरातील टाका ग्राउंडवर स्थित ऐतिहासिक पाण्याच्या टाकीवर बेंचमार्क स्थापित करण्यात आला आहे. या पाण्याचा टाकीचा वापर सर्वे स्टेशन म्हणून टोपोग्राफिकल सर्वे मध्ये वापर करण्यात आला. अशी माहिती यावेळी प्रविण कडू यांनी दिली.